Sunday, September 23, 2007

Chak de India

India Vs Pakistan in a World Cup Final.. Does it get bigger than this?
On Monday, entire cricketing freternity will be glued to television
to watch a spectacle of a lifetime. Whatever the result is,
there will millions at stake, and one thing is for sure.. Whichever side wins,
will remember it for a long time

And of course, isn't it biggest irony that 3 major players from Indian side, will
not be part of this. Tendulkar,Dravid and Ganguly have served Indian cricket for around last two decades , But... when THE MOMENT arrives, none of them is here. Is it a blessing in disuise?
Sometimes you need to come out of cobwebs and experience tries to take you into
that comfort zone. You no more tend to be ferocious and risk-taking. and having this young side, which knows no barrier , no limits has certainly helped. These guys are not thinking about loosing and have a great mindset to fight till the end.
So I think not having top 3 has helped India.
Experience brings in that feeling of "Been there, Done that", which seems a no-no for
20-20 cricket. So this game belongs to Yuvraj, MS, Robin Utthappa and players like that.
Sachin, Rahul and Saurav have served indian cricket a lot. There is still a lot they
can offer in one-dayers and tests. But not sure if they can cope with the speed, drama and adrenaline rush of 20-20.

So important question to be asked is, will the big-3 be missed? I guess not. not in this shorter version of the game. Such is the format of 20-20.
Did Australian's missed Ricky Ponting in semi-finals?
There is hardly any time to think of such questions in this format.
And ofcourse, life goes on, if anything I have learned in this short IT corporate of mine is, nobody is indespensible.
So sorry Mr. tendulkar,Dravid and Ganguly. But the fact is, you will not be missed
on Monday in a WC final.
On the flip side, because these 3 biggest players are not in the team, India could
try out some young players like Rohit Sharma and ofcourse the old guns like Sehwag.
And boy, did they clicked? Pathan looks back in rhythm, Harbhajan is enjoying and
Yuvraj is blazing away anything that comes in the way.

I am still not sure if this underwear version of the game will be a hit always.
There could not be just 20-20 series between 2 nations, can there be?
How will players respond if there is nothing to gain?
Will it be same intensity if there is nothing to gain?
But what the heck, who cares, this is the time to Chant THE mantra
So cheer with me
CHAK DE INDIA...

Sunday, July 8, 2007

निरुपयोगि

काल माझ्या मैत्रिणिने मला एक अनाहुत सल्ला दिला. म्हणे "जि गोष्ट आपल्याकडे नाही, तर ती दुसर्याकडे मागायला लाजु नको"
तीचा उद्द्देश "तोच" होता. माझ्याकडे आजीबात डोके नाही यावर तिचा ठाम विश्वास आहे. असुदे बापडा.. मी तरी काय करणार!!
पण सहज डोक्यात आले तश्या कितितरी निरुपयोगि वस्तु घेउन आपण फ़िरत असतोच की..
आता काही साधी सरळ उदाहरणे द्यायचीच झाली तर "आशीश नेहरा batting ला येताना हातात bat घेउन येतो"
आता याला bat चा उपयोग काय हेच माहीती नाही तर ती आणायची कशाला? पण तो bat घेउनच batting ला
येणार. दिसायला बरे दिसले पहिजे ना!!!
हिमेश रेशमियाला तोंडाचा काय उपयोग, पण देवाचा नाइलाज झाला असावा, म्हणुन दिले आपले एक तोंड.
नाहीतर फ़क्त नाक आणि डोळे असलेला हिमेशला डोक्यावर टोपी आणि तोंडावर बुरखा घेउन फ़िरावे लागले असते.
हिमेशच्या टोपीवरुन आठवले, तसा त्याला टाळु असण्याचाही फ़ार उपयोग नाही.. आणि त्याच्या लहानपणि त्याची आइ
टोपी कढुन टाळु भरत असेल व परत टोपी घालुन त्याला झोपवत असेल असा विचार उगिचच माझ्या मनात येतो..

सरकारी officeमध्ये टेबल , खुर्च्या आणि त्या फ़ायली का असतात बरे? ते पण असेच.. दिसायला बरे दिसावे म्हणुन..
खरे म्हणजे सरकारी ऒफ़ीस मध्ये २-४ बिछाने, उश्या(किंवा उषा) आणि एक पानपट्टी इतके असले तरी बास.

माझा मित्र सत्या, खिशात पाकीट(पैश्याचे) घेउनच फ़िरणार.. आता काही उपयोग आहे का त्याचा? चहाचे पैसे द्यायचे म्हणले की
"तु दे अत्ता, मी नन्तर देतो", अरे मग ते पाकीट काय उगिच खिश्यातले वजन वाढवायला घेउन येतोस?
पण मि हे त्याला अत्तापर्यन्त बोललो नाही कारण तो मग खरच पाकीट घरी ठेउन येइल.

पुण्यातल्या रस्त्यांवरचे सिग्नल, काय उपयोग आहे त्यांचा हे मला आईशप्पथ अजुन नाही कळाले. उगिच आपले ते लाल,हिरवे, पिवळे
दिवे बदलत असतात,कोणि बघत नाही त्याच्याकडे. बर याचा उद्देश तर दिसायला चांगले असणे हा पण नाही, पण ते तिथे का आहेत बरे..

जसे सिग्नलचे तसेच ट्राफ़िक पोलिसांचे.. पण सिग्नलवर उभारल्याचा त्याना निदान "फ़ायदा" होतो. आपल्याला नाही.

तर सांगायचा मुद्दा हा की जगात कित्येक गोष्टी आणि कित्येकजण निरुपयोगि आहेत. तसेच माझे डोकेदेखिल..
ते तरि रिकामे असले म्हणुन काय फ़रक पडला.

Saturday, June 16, 2007

Katha

सकाळी उन्ह डोक्यावर आली तशी महाद्याला जाग आली.
कोणीतरी त्याला हलवत होते..
"महाद्या, ए महाद्या, उठं"

त्यान डोळं किलकिलं करुन इकडंतिकडं बघितलं तसा त्याला गण्या दिसला.
अंगणातच जमिनीवर महाद्या पडलेला होता म्हणजे रातच्याला झहीराबीच्या गुत्त्यावर बैठक झाली आहे हे गण्याने ओळखले.
"काय र गण्या, आज सकाळ सकाळ आलास, तुझ्या दादाकडे काय काम न्हाय राहिल का?" महाद्या पांघरुण बाजुला करत म्हणाला.
"मला काय तुझ त्वांड बघायची हौस हाय व्हय! दादांचच काम घेउन आलोय, दादानी पैकं धाडलं हायत", गण्याने वैतागुन उत्तर दिले.
"आं, सकाळ सकाळ थट्टा सुचती व्हय रे तुला?
"हे घे पैक आणी मोजुन बघं, मला जाउदे", गण्याने पैसे महद्याच्या हातात कोंबले व तो चालु लागला.
"याला काय झालं सकाळच्या पारी चिडायला" असं म्हणत महाद्या पैसे मोजु लागला.

"बा, साळंत फ़ी मागतायत" गंगीन महाद्याला आठ्वण करुन दिली.
"बरं बघु. अन आय कुठय तुझी?" महाद्यान गंगीला विचारलं.

"म्या बी शोधतीया. सकाळधरनं कुठंशी गेली हाय, अजुन आलि न्हाय"
"म्हंजे?" महाद्याने प्रश्नार्थक चेहरा केला तशी गंगी बी घाबरुन गेली.

इतक्यात लांबुनच अप्पा पळत येताना दिसला.
जवळ आला तसा आप्पा धापा टाकतच बोलला.
"गंगे तु आत जा. " किलबिले डोळे करुन गंगी आत गेली.
"काय रं? झेपत न्हाय तर घेतो कशापायी?", गंगी आत जाताच बंड्या ओरडला.
"म्हंजे?"
"इतकं मारतात व्हय रं कोणि बायकोला, पोलिस येतायत इकड, तुझ्या बायकोचं मडं पडलय़ नदीकाठी."
"आं? काय बोलतोयस?", महाद्याची झोप पार उडाली,

महाद्याला लांबुन २ पोलिस व खुद्द दादा येताना दिसले तसे त्याचे पाय लटपटायला लागले.
पोलिसानी जवळ येताच दादाना प्रश्न केला,
"दादा, हाच आला होता का काल पैसे मागायला तुमच्याकडे?"
"हो", दादानी उत्तर दिले.
"काय रे लक्श्मी तुझिच बायको ना?", पोलिसाने महाद्याला प्रश्न केला.
"व्हय.. पण.."
"तुला एक मुलगी आहे असं दादा सांगत होते."
"व्हय जी" महद्याने उत्तर दिले.
"अरे तिचा तरी विचार करायचा होतास."
"पण म्या काय बी न्हाय केले जी"
"मग गण्याने काल रात्री तुला दारु पिउन बायकोला मारताना बघितले ते काय खोटे काय? आणि आता तु जेलमध्ये गेल्यावर त्या पोरीच काय",
गंगीला काल रात्रीचा प्रसंग आठवला.

------------------------------------
बा दिवेलागणीपर्यंत नाही आल तशी आय अंगणात येरझार्या घालत होति..
आता बा इतक्या उशिरान येणार म्हणजे परत पिउन येणार.. म्या बूकं आवरुन आत जात होते इतक्यात वास आला.
तो आंबलेला वास आता रोजचाच झाला होता, बा शाळंसमोरच्या गटारीत पडलेला सापडल्यापासनं कोण मत्रिणि बी माझ्याशी बोलत न्हाइत.
पण हे बा ला कोण सांगायच?
मास्तर म्हणत्यात दारु पिल्यानं पोटात किडं होतात, माझ्या बा ला काही नाही ना होणार?
बा अंगणात आला तसा आय बोलली
"चार घास खाउन घ्या आणी मग काय ते बोला"
"नग मला! आप्पाकडे चा झालाय", बा घुश्श्यातच होता.
"तर.. एक कप चा ने पोट भरतय व्हय? दारु ढोसुन आलाय म्हणुन सांगा की त्या अप्पाबरोबर"
"जेवायला नग म्हणुन संगितलं न तुला एकदा?" महाद्या लक्श्मीवर खेकसलाच.
म्या आत जायला निघाले.. तशि २ घटका शांतता राहिलि
"काम न्हाय मिळालं?" आयेनं विचारल.
"न्हाय" बाने तुटकच उत्तर दिले
"दादांकडं जाणार व्हता न?"
दादांचे नाव आयेनं काढले तसे बा जरा जस्तिच चिडला.

"गेलतो"
"मग? काय म्हणाले दादा?" आयेनं विचारले.
"बघुया म्हनले" बा नं तोंड फ़िरवत उत्तर दिले.
"बघुया म्हंजे? आन हिकडं बघुन बोला की" आता आयपण इरेला पेटली होति.
"तु दादांकडचे काम बंद कर" बा ने आयेला सांगितले.

"आणी हे काय नविनच? अन मग खायचं काय?"
"मी बघतु. अप्पाकडे मागुन बघतु. पण तु दादांच्या घरी जाउ नगस.."
"घरात खायला कायबी शिल्लक न्हाई आता"
"उद्या मागतो अप्पाकडे"
"आप्पानं एकवार न्हाय म्हणुन संगितलेय ना? आणी मागल्या येळेला दादांनीच तर पैकं दिलं होतं, ते पण मगितल्यापेक्शा शम्भर रुपये जस्तिच दिले होतं ना?"
"पण तु कशापायी दादांची तरफ़दारी करतेय? तुला सांगितले ना एकदा दादांकडे कामाला जायचे न्हाइ म्हणजे न्हाइ, आत जा आणी त्या पोरीला खायला द्या काहीतरी"
"पण मी उद्या सकाळी एकदा दादांकडे जाउन मागुनतर बघते"

"आत जा म्हणुन सांगितले ना तुला एकदा, आणी त्या दादाकडे गेली तर तुझं तंगड मोडुन ठेवीन" बा ने आता हातच उगारला.
बा चा उगारलेला हात बघुन आय गुमानं आत आली. म्याबी आयेपाठोपाठ आत गेली.
बा तिथेच जमीनीवर तोल जाउन पडला, व घोरु लागला.

-----------------------------------------------------------------------

"आम्ही आहोत ना!..... म्हणजे आम्ही काळजी घेउ पोरिचि", दादा कळवळ्याने म्हणाले तशी गंगी भानावर आली.

"दादा, तुमच्यासारखी देवमाणसे आहेत म्हणुन हे जग चालले आहे बघा",पोलिस म्हणाला.

"पोरी दादांकडे राहशील ना?" पोलिसानं विचारली तशि गंगी बावरुन गेली.

पोलिसाने महाद्याला बेड्या घातल्या, व घेउन जाउ लागले तशी गंगी बावरुन दादांकडे बघु लागली.
दादानी खांद्यावर ठेवलेला हात तिने बाजुला केला व एकदा झोपड्याकडे पाहिले. आधिच रिकाम असणार घर तिला जरा जास्तच ओकबोकं वाटु लागलं.
तसा गंगीनी कसला विचार पक्का केला व तिने पुढे येउन दादांचा हात हातात धरला
तसे दादा गालात हसले व गंगीचा हात हातात घेउन वाड्याकडे चालु लागले..

Sunday, May 20, 2007

pretty woman

pretty woman ज्युलिया रोबर्ट्स व रिचर्ड गिअर चा संयत अभिनय व उत्कृष्ठ दिग्दर्शन. मला हा चित्रपट का आवडतो माहीत नाही. पण चित्रपट आवडण्यासाठी माझा एक साधा मापदंड आहे.जो चित्रपट मनाला भावतो, मनोरंजन करतो, तो चांगला. म्हणुन मला जुना "सोलहवा साल" देखिल आवडतोतसाच "सत्या" देखिल आवडतो.. काल pretty woman पाहिला आणि त्यावर लिहावेसे वाटले.. म्हणले आता आपला blog आहेच तर खरडावे थोडे..तर pretty woman जसा मला भावला तसा..

ही खरे तर एक परीकथा, म्हणजे ज्याला आपण मराठीत आजकाल "fairy tale" म्हणतो तशी..
हा चित्रपट १९९१ साली रिलीज झाला. पण मी पाहिला तो पहिल्यांदा मि US ला आलो होतो तेव्हा.म्हणजे २००६ साली. म्हणजे तो तोपर्यंत classic movie झाला होता. आणि त्यानंतर अनेकदा पाहिला. चित्रपटाचे कथानक खुप साधारण, विविअन(ज्युलिआ रोबर्ट्स) एक रस्त्यावरचि hooker.तर लुइस एड्वर्ड्स (रिचर्ड गिअर) एक बिलियोनेअर. त्याचा buisiness म्हणजे मोडकळिला आलेले उद्योग विकत घ्यायचेव नंतर ते parts by parts विकायचे.. विविअन च्या भाषेत सांगायचे तर "similar to कार चोरुन त्याचेसुटे भाग विकणे". तर अश्याच एका buisuness assignment साठी तो LA ला आला असता, तो विविअनला भेटतोव त्यानंतर तिला तो एका आठवड्यासाठी "ठेउन घेतो".. (म्हणजे अगदी गावच्या पाटलाने सोनाबाई ला "ठेवावे",तसे)..सुरवातीला फ़क्त "buisness offer" म्हणुन विविअन ही offer स्विकारते,व त्या एका आठवड्यात दोघे कसे एकमेकात गुंतत जातात त्याची ही कथा.खरे तर यातील पात्रे आपल्याला कुठेही ओळखीची नाही वाटत.म्हणजे आपल्याला एक अमेरिकन बिलिनेयर कशाला भेटेल.. आणि आपण "त्यातले" नाही म्हणजे (ज्युलिआ रोबर्ट्स सारखी) सुंदर वेश्या कशाला भेटेल..पण कथानकातील ओघवत्या मांडणीमुळे आपण चित्रपट पहात राहतो.
ज्युलिया रोबर्ट्स चा सहज सुंदर अभिनय व रिचर्ड गेयर चा संयत अभिनयाने ही दोन पात्रे अ़़क्शरश: जिवंत झाली आहेत.संपुर्ण चित्रपट या दोघाभोवती फीरतो, त्यामुळे बाकी पात्रे तशी फारशी महत्वाची नाहित, पन हॊटेलचा manager , बार्नी लक्शात राहतो.तसेच एड्वर्ड्सचा lawyer ही लक्शात राहतो.दोन तासात एड्वर्ड्सचा निश्ठुर , professional broker ते buisiness decision देखील मनाने घेणारा broker,हा प्रवास पटतो, तर विविअन चा रस्त्यावरिल वेश्या ते एक विचारी, हुशार स्वभिमानी व articulate मुलगी ह प्रवास पटतो.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, हा प्रवास करण्यासाठी दोघानी एकमेकाना केलेली नकळत मदत. यामुळेच सुरवातीला अत्यंत विजोड वाटणारी ही जोडी अखेर "made for each other" वाटते.
चित्रपटातले संवाद देखील "चुरचुरीत" म्हणावे असे... "store dont love people, they love credit cards"कींवा अखेरीस जेव्हा विविअन जाते व एड्वर्ड्स , बार्नी ला २५०,००० चा कंठहार परत करायला सांगतो तेव्हा, बर्नी चा,"Must be difficult to let go such beautiful thing" हा संवाद, अचुक timing मुळे प्रचंड परीणाम करुन जातात.
यातील गाणी देखिल खुप गाजली, pretty woman , हे title song तर अजुनही बर्याचदा ऐकायला मिळते.
मला याचे आश्चर्य वाटते की हिंदि चित्रपट वाल्यानी अजुन याची copy कशी नाही केलि ते?तसा सल्लुमिया चा बागी थोडाफ़ार अशाच कथानकाचा असला तरी, तो romantic, action movie.आणि तसेही एक खरीखुरी वेश्या साधारण जीवन जगते, हा concept च आपल्याकडे पटेल का नाही कोणास ठाउक?
तर असा हा pretty woman, फारसा काही संदेश द्यायचा वगैरे प्रयत्न न करता, मनोरंजन करतो.. म्हणुनच कदाचित मला आवडतो..

Friday, May 11, 2007

श्री गणेशा

चला blog तरी चालू केला। आता इथे लिहायाचे काय असा मोठा प्रश्न आहे।
पण ज्याने उदर (लंबोदर ) दिले तोच पनीर टिक्का देयिल। तसे बघितले तर मी इथे काहीही लिहु शकतो.
पण आमचे हे लिहिणे म्हणजे.. पांढर्या वरचे काळे..
म्हणुन हे नाव अघळ पघळ..
आणि या अघळ पघळचा आणि पु. लं.च्या अघळ पघळ चा काही संबध नाही..
तो म्हणजे एका सिद्धहस्त लेखकाचा masterpiece.
आणि हे म्हणजे अक्शरश: अघळ पघळ..

तो पेश है.... मेरा debut blog
अघळ पघळ