pretty woman ज्युलिया रोबर्ट्स व रिचर्ड गिअर चा संयत अभिनय व उत्कृष्ठ दिग्दर्शन. मला हा चित्रपट का आवडतो माहीत नाही. पण चित्रपट आवडण्यासाठी माझा एक साधा मापदंड आहे.जो चित्रपट मनाला भावतो, मनोरंजन करतो, तो चांगला. म्हणुन मला जुना "सोलहवा साल" देखिल आवडतोतसाच "सत्या" देखिल आवडतो.. काल pretty woman पाहिला आणि त्यावर लिहावेसे वाटले.. म्हणले आता आपला blog आहेच तर खरडावे थोडे..तर pretty woman जसा मला भावला तसा..
ही खरे तर एक परीकथा, म्हणजे ज्याला आपण मराठीत आजकाल "fairy tale" म्हणतो तशी..
हा चित्रपट १९९१ साली रिलीज झाला. पण मी पाहिला तो पहिल्यांदा मि US ला आलो होतो तेव्हा.म्हणजे २००६ साली. म्हणजे तो तोपर्यंत classic movie झाला होता. आणि त्यानंतर अनेकदा पाहिला. चित्रपटाचे कथानक खुप साधारण, विविअन(ज्युलिआ रोबर्ट्स) एक रस्त्यावरचि hooker.तर लुइस एड्वर्ड्स (रिचर्ड गिअर) एक बिलियोनेअर. त्याचा buisiness म्हणजे मोडकळिला आलेले उद्योग विकत घ्यायचेव नंतर ते parts by parts विकायचे.. विविअन च्या भाषेत सांगायचे तर "similar to कार चोरुन त्याचेसुटे भाग विकणे". तर अश्याच एका buisuness assignment साठी तो LA ला आला असता, तो विविअनला भेटतोव त्यानंतर तिला तो एका आठवड्यासाठी "ठेउन घेतो".. (म्हणजे अगदी गावच्या पाटलाने सोनाबाई ला "ठेवावे",तसे)..सुरवातीला फ़क्त "buisness offer" म्हणुन विविअन ही offer स्विकारते,व त्या एका आठवड्यात दोघे कसे एकमेकात गुंतत जातात त्याची ही कथा.खरे तर यातील पात्रे आपल्याला कुठेही ओळखीची नाही वाटत.म्हणजे आपल्याला एक अमेरिकन बिलिनेयर कशाला भेटेल.. आणि आपण "त्यातले" नाही म्हणजे (ज्युलिआ रोबर्ट्स सारखी) सुंदर वेश्या कशाला भेटेल..पण कथानकातील ओघवत्या मांडणीमुळे आपण चित्रपट पहात राहतो.
ज्युलिया रोबर्ट्स चा सहज सुंदर अभिनय व रिचर्ड गेयर चा संयत अभिनयाने ही दोन पात्रे अ़़क्शरश: जिवंत झाली आहेत.संपुर्ण चित्रपट या दोघाभोवती फीरतो, त्यामुळे बाकी पात्रे तशी फारशी महत्वाची नाहित, पन हॊटेलचा manager , बार्नी लक्शात राहतो.तसेच एड्वर्ड्सचा lawyer ही लक्शात राहतो.दोन तासात एड्वर्ड्सचा निश्ठुर , professional broker ते buisiness decision देखील मनाने घेणारा broker,हा प्रवास पटतो, तर विविअन चा रस्त्यावरिल वेश्या ते एक विचारी, हुशार स्वभिमानी व articulate मुलगी ह प्रवास पटतो.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, हा प्रवास करण्यासाठी दोघानी एकमेकाना केलेली नकळत मदत. यामुळेच सुरवातीला अत्यंत विजोड वाटणारी ही जोडी अखेर "made for each other" वाटते.
चित्रपटातले संवाद देखील "चुरचुरीत" म्हणावे असे... "store dont love people, they love credit cards"कींवा अखेरीस जेव्हा विविअन जाते व एड्वर्ड्स , बार्नी ला २५०,००० चा कंठहार परत करायला सांगतो तेव्हा, बर्नी चा,"Must be difficult to let go such beautiful thing" हा संवाद, अचुक timing मुळे प्रचंड परीणाम करुन जातात.
यातील गाणी देखिल खुप गाजली, pretty woman , हे title song तर अजुनही बर्याचदा ऐकायला मिळते.
मला याचे आश्चर्य वाटते की हिंदि चित्रपट वाल्यानी अजुन याची copy कशी नाही केलि ते?तसा सल्लुमिया चा बागी थोडाफ़ार अशाच कथानकाचा असला तरी, तो romantic, action movie.आणि तसेही एक खरीखुरी वेश्या साधारण जीवन जगते, हा concept च आपल्याकडे पटेल का नाही कोणास ठाउक?
तर असा हा pretty woman, फारसा काही संदेश द्यायचा वगैरे प्रयत्न न करता, मनोरंजन करतो.. म्हणुनच कदाचित मला आवडतो..
Sunday, May 20, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
सुरेख मुवी. काही वादच नाही. शेवटच्या ओळीवर मात्र काहीतरी लिहावेसे वाटले. एखादी वेश्यापण साधारण आयुष्य जगत असेल ही कल्पना पटेल की नाही वगैरे ...
खरे सांगावे तर हे विचार फक्त देशाबाहेर आल्यावर येतात. का आणि कसे हा वेगळा चर्चेचा विषय होईल :)
असो ... छान लिहीलायस.
Post a Comment