Sunday, July 8, 2007

निरुपयोगि

काल माझ्या मैत्रिणिने मला एक अनाहुत सल्ला दिला. म्हणे "जि गोष्ट आपल्याकडे नाही, तर ती दुसर्याकडे मागायला लाजु नको"
तीचा उद्द्देश "तोच" होता. माझ्याकडे आजीबात डोके नाही यावर तिचा ठाम विश्वास आहे. असुदे बापडा.. मी तरी काय करणार!!
पण सहज डोक्यात आले तश्या कितितरी निरुपयोगि वस्तु घेउन आपण फ़िरत असतोच की..
आता काही साधी सरळ उदाहरणे द्यायचीच झाली तर "आशीश नेहरा batting ला येताना हातात bat घेउन येतो"
आता याला bat चा उपयोग काय हेच माहीती नाही तर ती आणायची कशाला? पण तो bat घेउनच batting ला
येणार. दिसायला बरे दिसले पहिजे ना!!!
हिमेश रेशमियाला तोंडाचा काय उपयोग, पण देवाचा नाइलाज झाला असावा, म्हणुन दिले आपले एक तोंड.
नाहीतर फ़क्त नाक आणि डोळे असलेला हिमेशला डोक्यावर टोपी आणि तोंडावर बुरखा घेउन फ़िरावे लागले असते.
हिमेशच्या टोपीवरुन आठवले, तसा त्याला टाळु असण्याचाही फ़ार उपयोग नाही.. आणि त्याच्या लहानपणि त्याची आइ
टोपी कढुन टाळु भरत असेल व परत टोपी घालुन त्याला झोपवत असेल असा विचार उगिचच माझ्या मनात येतो..

सरकारी officeमध्ये टेबल , खुर्च्या आणि त्या फ़ायली का असतात बरे? ते पण असेच.. दिसायला बरे दिसावे म्हणुन..
खरे म्हणजे सरकारी ऒफ़ीस मध्ये २-४ बिछाने, उश्या(किंवा उषा) आणि एक पानपट्टी इतके असले तरी बास.

माझा मित्र सत्या, खिशात पाकीट(पैश्याचे) घेउनच फ़िरणार.. आता काही उपयोग आहे का त्याचा? चहाचे पैसे द्यायचे म्हणले की
"तु दे अत्ता, मी नन्तर देतो", अरे मग ते पाकीट काय उगिच खिश्यातले वजन वाढवायला घेउन येतोस?
पण मि हे त्याला अत्तापर्यन्त बोललो नाही कारण तो मग खरच पाकीट घरी ठेउन येइल.

पुण्यातल्या रस्त्यांवरचे सिग्नल, काय उपयोग आहे त्यांचा हे मला आईशप्पथ अजुन नाही कळाले. उगिच आपले ते लाल,हिरवे, पिवळे
दिवे बदलत असतात,कोणि बघत नाही त्याच्याकडे. बर याचा उद्देश तर दिसायला चांगले असणे हा पण नाही, पण ते तिथे का आहेत बरे..

जसे सिग्नलचे तसेच ट्राफ़िक पोलिसांचे.. पण सिग्नलवर उभारल्याचा त्याना निदान "फ़ायदा" होतो. आपल्याला नाही.

तर सांगायचा मुद्दा हा की जगात कित्येक गोष्टी आणि कित्येकजण निरुपयोगि आहेत. तसेच माझे डोकेदेखिल..
ते तरि रिकामे असले म्हणुन काय फ़रक पडला.

4 comments:

Anonymous said...

साहेब, मराठीत व्याकरणाचे काही नियम असतात. पाळत चला लिहिताना.. म्हणजे वाचक वेलांटी उकारांवर खटकणार नाहीत...

ओहित म्हणे said...

ha ha ... sahi hai! पुण्यातल्या सिग्नलचा खरच मलाही प्रश्न पडतो ... एकदम सहमत!

Suyash said...

bhava kay kay lihit astos

Amruta Divekar said...

Completely agree :)